अरुण विद्यामंदिर,संग्राम बालवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
इचलकरंजी:
अरुण विद्यामंदिर, संग्राम बालवाडी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवार वार, दि.२४ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. बालवाडी व विद्या मंदिरच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘शिव छत्रपती जागर, सांस्कृतिक या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम करण्यात आला.
भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलां मुलीनी सुंदर सादरीकरण केले
स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले व संस्थेस भविष्यात आमच्या कडुन सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महेश कुगावकर अध्यक्ष वीर माहेश्वरी समाज पुणे, श्रीकांत स्वामी उद्योगपती लातूर, श्री जगदीश स्वामी अध्यक्ष नर्मदा ट्रॅव्हल्स ग्रुप लातूर, माननीय अँड सौ अलका स्वामी माजी नगराध्यक्षा इचलकरंजी नगरपालिका, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, माजी नगरसेवक दिलीप मुथा, युवराज माळी, विजय गलगले धनराज खंडेलवाल सुनील तोडकर, विश्वनाथ मेटे चंद्रकांत बडवे राहुल जानवेकर कुमार माळी सुवर्णा स्वामी बाबासो कितुरे नागेश पाटील उमाकांत दाभोळे सारिका बांगड, पुष्पा लड्डा, राजाराम तोडकर,अरुण बंडगर, अविनाश वेदांते, युवराज शहा,मारुती वीर, रवी माळी, सचिन देशमाने, शिवम केसरवाणी, सलीम शिकलगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संग्राम बालवाडी व अरुण विद्या मंदिरच्या पालकांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धा व लिंबू चमचा स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अशोकराव स्वामींनी महिला पालकांना मुलांची काळजी घेण्याचे व अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन या प्रसंगी केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800