डी के ए एस सी मध्ये राज्यस्तरीय काव्यवाचन व कथाकथन स्पर्धा संपन्न.
इचलकरंजी :
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करारांतर्गत आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय मराठी काव्यवाचन व कथाकथन स्पर्धा डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयात संपन्न झाल्या. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरजची विद्यार्थिनी कु. ऋता रमेश डांगे हिने दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामधील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवाजी विद्यापीठ मराठी संघाचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांच्यातील सर्जनशील लेखनाला चालना मिळावी व विद्यार्थ्यांमधून चांगले साहित्यिक निर्माण व्हावेत यासाठी शिविम संघ सातत्याने काव्यवाचन, कथाकथन, कथालेखन, निबंधलेखन इत्यादी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करत असते. त्यातूनच उद्याचे चांगले साहित्यिक तयार होतील. असा विश्वास आम्हाला आहे.” तर अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर म्हणाले, “ज्या काळात आभासी समाज माध्यमांचा अतिरेक झाला आहे. अशा काळात विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तकांच्या अंगणात आणायचं असेल तर अशा विविध स्पर्धा त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. लिहिण्याच्या, बोलण्याच्या निमित्ताने विद्यार्थी पुन्हा ग्रंथालयाकडे वळत आहेत. हे आशादायी चित्र उद्यासाठी महत्त्वाचे आहे.” या स्पर्धेचे परीक्षण प्रा. (डॉ.) एकनाथ पाटील व डॉ. शैलजा शिंदे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल –
काव्यवाचन स्पर्धा
प्रथम क्रमांक – कु. ऋता रमेश डांगे (शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज)
द्वितीय क्रमांक – कु. तेजश्री भीमराव शिंदे (श्रीमती.आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी)
तृतीय क्रमांक – कु. पल्लवी रविकांत गोरूले (कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी) उत्तेजनार्थ – कु. प्रीती राजू भिसे (डी.के.ए.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी)
कथाकथन स्पर्धा
प्रथम क्रमांक – कु. ऋता रमेश डांगे (शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज)
द्वितीय क्रमांक – कू.प्रतिभा रामदास बामणे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
तृतीय क्रमांक – कु.सुवर्णा कृष्णदेव सावंत (राजे रामराव महाविद्यालय, जत)
उत्तेजनार्थ – कु. पल्लवी रामेश्वर लिगाडे (डी.के.ए.एस.सी. कॉलेज इचलकरंजी.)
महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) सुभाष जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्रीमती भारती कोळेकर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रोहित शिंगे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800