ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी आज व्यापक बैठक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी आज व्यापक बैठक

इचलकरंजी :

वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी नियोजीत वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ, इचलकरंजी यांच्या वतीने व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक रविवार, दिनांक ०९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता श्री अलासे फार्म हाऊस, आमराई रोड, इचलकरंजी येथे होणार आहे. या बैठकीस मा. श्री. अशोकराव स्वामी (आण्णा) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

समाजाच्या परिवर्तनासाठी आणि पुढील दिशा निश्चित करण्यासाठी अधिकाधिक समाज बांधवांनी आणि भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन नियोजीत वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ, इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा