मराठी भाषेचा अनादर करणार्‍या  भैय्या जोशी यांच्या निषेधार्थ इचलकरंजीत ठाकरे सेनेची  जोरदार निदर्शने 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी भाषेचा अनादर करणार्‍या  भैय्या जोशी यांच्या निषेधार्थ इचलकरंजीत ठाकरे सेनेची  जोरदार निदर्शने. 

इचलकरंजी
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मराठी भाषेचा अनादर करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्या जोशी यांच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुतळा परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून सोडला. मराठी भाषेचा अनादर केल्याप्रकरणी जोशी यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली.
मुंबईत येणार्‍या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही’ असे वादग्रस्त विधान भैय्या जोशी यांनी केले होते. मराठी ही राजभाषा असून जोशी यांचे हे वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे.१०६ हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी बलिदान दिले ते हे ऐकण्यासाठी? असा सवाल संतप्त शिवसैनिकांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे जे सत्तेत बसले आहेत, त्यांनी हिम्मत असेल तर जोशी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. जोशी यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आंदोलकांनी जोरदार निदर्शने करत जोशी यांच्या प्रतिकात्मक फलकास जोडामार आंदोलन केले.
यावेळी जिल्हाप्रमुख वैभव उगळे, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, मलकारी लवटे, धनाजी मोरे, आनंदा शेट्टी, मनोज भाट, महेश बोहरा, गणेश शर्मा, गणेश जमटे, राजू मोकाशी, दत्ता साळुंखे, शिवाजी पाटील, सागर जाधव, भरत शिवलिंगे, शोभा गोरे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More