शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बंडोपंत मुसळे यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन
इचलकरंजी:
शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व आताचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडोपंत मुसळे (वय ५६) यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले.
सकाळी घरी असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अकाली निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बंडोपंत मुसळे गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर होते. दत्तनगर परिसरातील शिवररत्न चांदीचा गणपती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले.सर्वसामान्य जनतेसाठी धावून जाणारा जमिनीवरचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.माजी नगरसेविका मंगल मुसळे यांचे ते पती होते.
त्यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि सून असा परिवार आहे.त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले,यावेळी विविध राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व दत्तनगर परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.रक्षाविसर्जन आज रविवारी सकाळी ९ वाजता पंचगंगा नदिघाटवर होणार आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800