रोटरी क्लब, प्रोबस क्लब इचलकरंजी तर्फे ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
इचलकरंजी :
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य त्यांचे जीवनमान आणि विरंगुळा व्हावा यासाठी जेष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा हा राबवलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. असे गौरव उद्गार रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांनी केले.
रोटरी क्लब, प्रोबस क्लब, प्रोबस महिला क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ आणि रोटरी अँ न्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शरद पै बोलत होते. ते पुढे म्हणाले, रोटरी क्लब वेगवेगळ्या वयोगटातील महिला, पुरुष,युवक, युवती यांच्यासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात आलेले उपक्रम भविष्यात सुद्धा सुरूच ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. संतोष पाटील यांनी स्वागत केले. तर प्रोजेक्ट चेअरमन अभय यळरुटे यांनी प्रास्ताविक केले. महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी, अनुभवाची शिदोरी आपल्या पाठीशी असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेला उपक्रम चांगला असल्याचे नमूद केले. प्रशासन म्हणून काम करत असताना नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी, खड्डे विरहित रस्ते साफसफाईबाबत आपला प्राधान्य राहील असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. सॅम्युएल भंडारे व सामाजिक कार्याबद्दल अशोक जाधव यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर यतीराज भंडारी, महेंद्र मुथा, विठ्ठलराव डाके, रवींद्र सौंदत्तीकर, डी.एम. कस्तुरे, सागर पाटील, चंद्रकांत मगदूम, सदाशिव कदम, रामचंद्र कुडचे, हमिदा गोरवाडे, पुष्पा मोरे,सौ. स्वाती सातपुते, सौ. संमती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
दिवसभर चाललेल्या कार्यक्रमांमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचे वारी परतवारी या विषयावर, सुनिता नाशिककर यांचे ज्येष्ठांची सुरक्षा सायबर सुरक्षा या विषयावर, डॉ.अमर अडके यांचे सह्याद्रीच्या गिरीशिखरावर या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर रोटरी तर्फे जुने दिवस आठवूया कार्यक्रम त्यानंतर संगीत व मीमीक्री कार्यक्रम झाला. यावेळी ऑल इंडिया ज्येष्ठ नागरिक संघावर निवड झाल्याबद्दल रामकुमार सावंत यांचा तर महिला दिनानिमित्त शिवकालीन लाठीकाटे प्रशिक्षिका संजीवनी सुतार यांचा ही सत्कार करण्यात आला. आभार चंद्रकांत मगदूम यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक केसरकर व श्रीमती वैशाली नाईकवडे यांनी केले दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमास जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800