वस्त्र वारसा कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह प्रेक्षकांचा ठेंगा,सर्वाना सामावून घेत कार्यक्रम आयोजनाची अशोक स्वामींची सुचना.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वस्त्र वारसा कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह प्रेक्षकांचा ठेंगा,सर्वाना सामावून घेत कार्यक्रम आयोजनाची अशोक स्वामींची सुचना.

इचलकरंजी:
इचलकरंजी येथे सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्यावतीने येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात वस्त्र संस्कृती विषयक वस्त्र वारसा या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी डझनभर लोकप्रतिनिधीची नावे असलेली निमंत्रण पत्रिका काढण्यात आली,मात्र गलथान नियोजनाचा फटका बसल्याने शासनाचे पैसे वाया गेल्याची चर्चा उपस्थित मोजक्या प्रेक्षकात होती.
कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींसह प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने उद्घाटनाचा सोपस्कार जवळपास २ तास उशिराने पार पडला.
 राज्य शासनाच्यावतीनं इचलकरंजी इथं वस्त्र संस्कृती विषयक वस्त्र वारसा या कार्यशाळेला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं प्रारंभ झाला.२  दिवस चालणार्‍या या कार्यशाळेत महाराष्ट्राची पारंपारिक वस्त्र संस्कृती, वस्त्र संस्कृतीत होत असलेले बदल, वस्त्र संस्कृतीचंं महत्व आणि वस्त्र संस्कृतीचं जतन संवर्धन यावर विविध मान्यवरांची व्याख्यानं आणि चर्चासत्र होणार आहेत.पहिल्या दिवशी गलथान नियोजनाने उपस्थितीचा वणवा होता.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यशाळेला प्रारंभ झाला. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे मात्र यामध्ये वस्त्रोद्योगातील संस्था, जाणकार उद्योगपती यासह विविध घटकांना सामावुन घेणे गरजेचे होते असे नमुद करून राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी वस्त्रोद्योग हा शेतीखालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे. मात्र या व्यवसायाकडे किंबहुना छोट्या यंत्रमागधारकांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. हा व्यवसाय टिकण्या आणि वस्त्रोद्योगासाठी सांस्कृतिक आणि वस्त्रोद्योग विभागाने काही विशेष योजना राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तसेच वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्व घटकांना सामावून घेऊन अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी सूचना मांडत नियोजनावर अप्रत्यक्ष टीका केली. महापालिकेचे सहआयुक्त विजय राजापुरे यांनी वस्त्रनगरी इचलकरंजीत वस्त्रोद्योगाची कौतुकास्पद परंपरा असल्याचे सांगितले. उद्योगपती शामसुंदर मर्दा यांनी इचलकरंजीला वस्त्रोद्योगाची परंपरा असून वस्त्रोद्योगात बदलत्या काळानुसार बदलही होत आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि ज्ञान देणारी डीकेटीईसारखी संस्था नसती तर वस्त्रोद्योजकांची तिसरी पिढी या उद्योगात आली असती की नाही हे सांगता आले नसते, असे नमुद केले.यावेळी प्रकाश सातपुते, वैभव ढंगे, संतोष पाटील, चंद्रकांत मगदुम, चित्कला कुलकर्णी, ज्योती हिरेमठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत पहिल्या दिवशी प्राचीन शैली वस्त्र वारसा यावर विनय नारकर यांचे व्याख्यान झाले तर प्रोफे.डॉ. अश्‍विनी रायबागी यांचं भारतमाता आणि वस्त्रोद्योग यावर मार्गदर्शन झाले. भाग्यलक्ष्मी घारे यांनी कोकणातील काथ्या उद्योग यावर भाष्य केले तर बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी विणकाम आणि बदलते तंत्रज्ञान या विषयायावर मार्गदर्शन केले. केतकी शहा-मुक्कीरवार यांचे खण वस्त्र परंपरा आणि त्यातील बदल यावर व्याख्यान झाले. या कार्यशाळेस मोजकेच वस्त्रोद्योग अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरीक उपस्थित होते.शासनाचा पैसा हा कररूपी पैसा असून त्याचा योग्य विनिमय होणे गरजेचे आहे.मात्र लाखो रुपये खर्च करून सर्व घटकांना सामाऊन घेणे गरजेचे असते, फक्त कार्यक्रम केला हे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा मूळ वस्त्रोद्योग निगडित घटकांना व संस्थांना सामावून घेऊन नियोजनबद्ध कार्यक्रम करणे गरजेचे असल्याचे उपस्थित नागरिकांतून बोलले जात होते.
वस्त्र वारसा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अशोकराव स्वामी.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More