हातकणंगलेत ७४ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेची मंजुरी – झाकीर भालदार व रणजित पाटील यांचे विशेष प्रयत्न.
हातकणंगले:
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत हातकणंगले तालुक्यातील ७४ लाभार्थ्यांना योजना मंजूर झाली असून, यामध्ये धनगर गल्लीतील बाळासो उर्फ बबलू धनगर यांच्या मातोश्रींचा देखील समावेश आहे. या निर्णयामुळे संबंधित कुटुंबांच्या खात्यावर दरमहा रुपये १५००/- जमा होणार असून, ही आर्थिक मदत आजीवन सुरू राहणार आहे.
या योजनेच्या मंजुरीसाठी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष झाकीर भालदार आणि नगरसेवक रणजित पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. याअंतर्गत हातकणगलेतील अनेक गरजू कुटुंबांना योजना मंजूर करून देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना व अन्य शासकीय योजनांमध्ये गरजू नागरिकांना सहभागी करून घेण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे नेते करत आहेत.
ज्या लाभार्थ्यांना अजूनही या योजनेबद्दल माहिती नसेल किंवा कोणतीही मदत हवी असेल, त्यांनी नगरसेवक रणजित पाटील, दिलावर मोकाशी किंवा खासदार धैर्यशीलदादा माने यांचे कार्यालय यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या यशस्वी उपक्रमामध्ये शिवसेना खासदार धैर्यशीलदादा माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, दिलावर मोकाशी, संजय गांधी योजना कार्यालय प्रशासन व भूषण पाटील यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. सर्व सहकार्याबद्दल आयोजकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
मंजुरी पत्र वितरित करताना खा.धैर्यशील माने,झाकीरहुसेन भालदार,रणजित पाटील

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800