अस्पर्शित प्रितीचा शोध अप्रतिम अभिवाचन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अस्पर्शित प्रितीचा शोध अप्रतिम अभिवाचन

इचलकरंजी –
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या ५३ व्या वसंत व्याख्यानमालेत सहावे पुष्प गुंफतांना डॉ. निर्मोही फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जयवंत दळवी यांच्या साहित्यातील अस्पर्शित प्रितीचा शोध या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना त्यांनी चरित्रात्मक समीक्षा करताना आयुष्याशी जोडलेले धागेदोरे त्यात दिसतात. वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत कोकणात राहिलेले दळवी त्याचा खूप मोठा पगडा त्यांच्यावर पडला होता. कोकणात गूढ वातावरण लपलेल, दडलेल आजही दिसत. त्याकाळात आजूबाजूला त्यांना दिसलेल्या अनुभवलेल्या व्यक्तीरेखा साहित्यात उमटलेल्या आहेत. वंदना गुजरे यांनी रुक्मिणी नावाच्या कथेतून सुंदर रुक्मिणीला मुलाबरोबर प्रेमभंग झालेला तिला साजेसा नवरा मिळाला नाही तरीही १० अपत्ये झाली. त्यामुळे वासना व प्रेम यातील द्वंद्व सुरेख सादर केले. रुक्मिणी वेडी झाल्यावर १० वर्षे उपचारांनी घरी परत आल्यावर तीचा अनुभव अंगावर काटा उभा करणारा ठरला.
श्री. योगेश केळकर यांनी त्या दोघी या कथेतून १६ व्या वर्षी वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रियांबद्दल प्रथम आकर्षण कळाल्यावर व त्या वयस्क झाल्यावरही त्यांचे रस्त्यावरील लोकांशी वागणे कसे होते हे भावपूर्ण सादर केले.
संध्याछाया हे दळवींचे गाजलेले नाटक त्याचा सारांश योगेश केळकर व वंदना गुजरे यांनी अतीशय ताकतीने सादर केला. आजही समाजात मुले होऊनही म्हातारपणी त्या मुलांकडे कसे डोळे लागलेले असतात भावनिक कल्लोळ आईवडिलांच्या मनात कसा तयार होतो. तसेच आज आपल्या घरोघरी हे चित्र दिसत आहे. सध्या मुलांकडून पैसे नकोत तर त्यांच्या सहवासासाठी आईवडील आतुर असतात हे अप्रतीम अभिवाचन सादर केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निर्मोही फडके यांनी केले. मानसी जांभेकर यांनी ध्वनीयोजनेसाठी साथ दिली. कथांमधून नाटकातून त्यांनी जयवंत दळवीची जन्मशताब्दी सुरेख सादर केली. श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजना नंतर पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले. उल्हास सुर्यवंशी, वैभव चांदेकर, चेअरमन लक्ष्मी प्रोसेस यांचे सहकार्य लाभले. पाहुण्यांची ओळख व आभारप्रदर्शन संचालक मिनाक्षी तंगडी यांनी केले. यावेळी कार्यक्रमास रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून जुन महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील.इमनपा आणि ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याने कार्यक्रमाचा शुभारंभ

Read More

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून जुन महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील.इमनपा आणि ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याने कार्यक्रमाचा शुभारंभ