वस्त्रोद्योग तज्ञ धनपाल टारे यांचे निधन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वस्त्रोद्योग तज्ञ धनपाल टारे यांचे निधन

इचलकरंजी :
पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल  ( पीडीएक्सएल) चे माजी अध्यक्ष व वस्त्रोद्योग क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील जाणकार नेतृत्व असणारे येथील धनपाल अण्णासो टारे (वय ८७ )यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
  देशातील वस्त्रोद्योगातील एक जाणकार नेते म्हणून धनपाल टारे यांची ओळख होती. या क्षेत्रातील विविध संस्थांवर त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. देशभर संघटित असणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी एकत्र जोडण्यासाठी  ऑल इंडिया पॉवरलूम फेडरेशनची स्थापना करण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट डेव्हलपमेंटचे ते अध्यक्षही होते. याशिवाय महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष इचलकरंजी येथील यंत्रमाग धारकांची जुनी संस्था असलेल्या इचलकरंजी पावरलूम असोसिएशनचेही ते अध्यक्ष होते.
 देशातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयावेळी त्यांचा सल्ला मोलाचा मानला जात होता. देशातील वस्त्रोद्योग उत्पादने अधिक निर्यात व्हावीत यासाठी त्यांनी मोठी धडपड केली. यासाठी केंद्रशासनांना त्यांनी विविध उपाय योजना सुचवल्या होत्या.
    देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय समजले जात. इचलकरंजी शहरातील यंत्रमाग आणि कामगारांच्या संघर्षा वेळी धनपाल टारे यांचे निवासस्थान म्हणजे कामगार आणि यंत्रमाग धारकांच्या नेत्यांच्या साठी एक विश्वासाचे ठिकाण होते. धनपाल टारे यांच्या नेतृत्वाखालीच अनेक आंदोलनावेळी जो मार्ग निघत असे. कामगार नेते माजी आमदार के एल मलाबादे यांचाही त्यांच्यावर मोठा विश्वास होता. कामगारांच्या आंदोलनावेळी धनपाल टारे यांनी टाकलेला शब्द महत्त्वाचा ठरत असे. एकीकडे यंत्रमाग धारकांचे नेते प्रकाश आवाडे तर दुसरीकडे कामगारांचे नेते कॉम्रेड के. एल. मलाबादे अशा भिन्न विचारांच्या नेत्यांना एकत्रित आणून यंत्रमाग जॉब रेट , कामगार वेतन वाढ अशा किचकट प्रश्न- आंदोलनात धनपाल टारे हे उत्तम समन्वयाचा मार्ग काढीत असत.
      गेले काही महिने त्यांची प्रकृती अस्वस्थच होती. आज पहाटे त्यांचे निधन झाले माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंतदर्शन घेतले. त्यांच्यावर इचलकरंजी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन बुधवारी सकाळी आठ वाजता इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव !23 देशांतील 25 हजार, तर सांगली जिल्ह्यातून 1 हजारहून अधिक हिंदू उपस्थित रहाणार! सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल !

Read More

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव !23 देशांतील 25 हजार, तर सांगली जिल्ह्यातून 1 हजारहून अधिक हिंदू उपस्थित रहाणार! सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल !