ICHMH51NEWS.IN
9921600800

महानगरपालिका वर्धापन दिन आणि जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न.रक्तदान करून प्रत्येकाने  आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महानगरपालिका वर्धापन दिन आणि जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न.रक्तदान करून प्रत्येकाने  आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील
इचलकरंजी
   इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन आणि जागतिक रक्तदान दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिका  आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आधार ब्लड बँक इचलकरंजी, स्व.बाळासाहेब दाते लायन्स क्लब ब्लड बँक आणि महालक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने आज गुरुवार दि.१२ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
Advt
     या रक्तदान शिबीराचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे हस्ते आणि उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार,उपायुक्त राहुल मर्ढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलन करून करणेत आला.
    शुभारंभ प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी यांनी स्वतः रक्तदान करून प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान करावे जेणेकरून एखाद्या गरजू रुग्णांचा जीव वाचविण्या साठी आपली मदत होईल असे मत व्यक्त केले.
Advt
     या प्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत,सहा आयुक्त रोशनी गोडे, रोटरी परिवारातील सदस्य, मारवाडी युवा मंच सदस्य, यांचेसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरात एकूण १६१  रक्तदात्यांनी रक्तदान केले.
    आजचे रक्तदान शिबीर आयोजनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनीलदत संगेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
  फोटो-    
रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आयुक्त पल्लवी पाटील व इतर
रक्तदान शिबिरात रक्तदान करताना आयुक्त पल्लवी पाटील
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा