ICHMH51NEWS.IN
9921600800

महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित सुप्रसिद्ध व्याख्याते मा.श्री.वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचा शहरातील सर्व महिला आणि युवती यांनी लाभ घ्यावा-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित सुप्रसिद्ध व्याख्याते मा.श्री.वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचा शहरातील सर्व महिला आणि युवती यांनी लाभ घ्यावा-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन  दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये शहरातील महिला व युवती यांचे करिता एखाद्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करावे या हेतूने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या संकल्पनेतून उद्या शुक्रवार दि.  १३ जून रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे सभागृह येथे दुपारी ४ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते *श्री वसंत हंकारे* यांचे *’बाप समजून घेताना’* या भावनात्मक विषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
          या व्याख्यानासाठी सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे तरी शहरातील  महिला व युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे कडून करण्यात येत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा