तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप इचलकरंजीतर्फे अंबाबाई भक्तांना पाणीवाटप इचलकरंजी : टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पै. तानाजीभाऊ जाधव यांच्या आगामी वाढदिवसाचे औचित्य साधून इचलकरंजी टायगर ग्रुपच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी विविध भागांतून हजारो भाविक पायी प्रवास करतात. प्रवासादरम्यान भाविकांची तहान भागावी आणि त्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने टायगर ग्रुपच्या सदस्यांनी महामार्गावर पाणीवाटपाचा उपक्रम राबविला. राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांचा वाढदिवस २ नोव्हेंबर रोजी असून, त्यानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला टायगर ग्रुपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुशांतभाऊ कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या उपस्थितीत भाविकांना पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी रणजीत म्हेतर, मल्लिकार्जुन अंगडी, आशिष चांडक, शिवम चव्हाण, ऋषिकेश सुतार, प्रमोद मंगलेकर, अभिषेक पाटील, आडेकर, आदर्श