जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींची बाजी
इचलकरंजी (३० सप्टेंबर) :
जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम मैदान येथे शालेय, शासकीय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करून आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
५८ किलो वजन गटात श्रेया अमोल जाधव (इयत्ता आठवी) हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर ४८ किलो वजन गटात समीक्षा सागर लवटे (इयत्ता सहावी) हिने द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. या दोन्ही खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर महेश बांदवलकर, मानद सचिव बाबासो वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन मारोतराव निमनकर व संस्थेचे विश्वस्त यांनी मुलींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी, उपमुख्याध्यापिका सौ. व्ही. एस. लोटके, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षक एस. एस. कोळी, ज्येष्ठ शिक्षक डी. डी. कोळी यांनीही विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या यशामध्ये जिमखाना प्रमुख बी. एस. माने, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक उत्तम मेंगणे व क्रीडा शिक्षक के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
वेटलिफ्टिंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनीसोबत शिक्षक वृंद
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







