ICHMH51NEWS.IN
9921600800

डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयात खंडेनवमी निमित्त शस्त्रास्त्र पूजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डी.के.ए.एस.सी.महाविद्यालयात खंडेनवमी निमित्त शस्त्रास्त्र पूजन

इचलकरंजी :
डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयातील एनसीसी विभागात दरवर्षीप्रमाणे यंदाही खंडेनवमी निमित्त शस्त्रास्त्र पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

एनसीसी कॅडेट्सनी सर्व शस्त्रास्त्रांची आकर्षक मांडणी करून पूजनाची तयारी केली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. खाडे यांच्या हस्ते शस्त्रास्त्र पूजन करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर.बी. जोग यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे स्वागत व नियोजन एनसीसी विभाग प्रमुख प्रा. ले. विनायक भोई यांनी केले. या प्रसंगी प्रा. रोहित शिंगे, प्रा. प्रथमेश गवळी यांच्यासह सर्व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

शस्त्रपूजन करताना प्राचार्य एस के खाडे व एनसीसी विभागाचे विद्यार्थी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा