अ.भा. जैन अल्पसंख्याक महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी प्रितम बोरा, राज्य कार्यकारिणीत राकेश बंब यांची निवड
इचलकरंजी –
अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी इचलकरंजीतील आचार्यश्री आनंद युवा मंचचे प्रमुख प्रितम प्रकाश बोरा यांची निवड झाली आहे. तसेच राज्य कार्यकारिणीत राकेश बंब यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या महासंघाच्या राज्य कार्यकारीणी बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विकास अच्छा, वीरेंद्र संकलेचा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोरा आणि बंब यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
निवडीनंतर प्रितम बोरा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “समाजाने माझ्यावर ठेवलेला विश्वास मी प्रामाणिकपणे पेलविण्याचा प्रयत्न करीन.” आचार्यश्री आनंद युवा मंचच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीविषयक विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. समाजकार्य क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
निवडीचे पत्र ललित गांधी यांच्या हस्ते स्वीकारताना प्रितम बोरा
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







