ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जणांना अटक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जणांना अटक

इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलिसांनी बंडगर मळ परिसरात छापा टाकून बेकायदा तिनपानी जुगार खेळणाऱ्या आठ जणांना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत सुमारे २ लाख ५८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोमवारी दुपारी बंडगर मळ येथील प्रविण बेलेकर यांच्या खोलीत ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस नाईक विकास कुबेर चौगुले (ब.नं.८५४) यांच्या पथकाने छापा टाकला.

या कारवाईत आकाश अनिल घट्टे (३६, गोकुळ चौक), राजबाबु रंगनाथ केसरवाणी (४०, पुजारी मळा), प्रविण बळवंत बेलेकर (४२, स्वामी मळा), मोहन बाळु कोळी (२९, बंडगर मळ), धिरज पंडीत गुरव (३२, बंडगर मळ), राहुल धनराज निसाद (२७, नारळ चौक), मंथन विश्वनाथ खवरे (१९, टायगर चौक) आणि आशुतोष चंद्रकांत शिंदे (२७, घोडके नगर) या आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून ७,३९० रोखसहा मोबाईल हॅण्डसेट (३८,०००) आणि तीन मोटारसायकली (२,१०,०००) असा एकूण २,५८,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ.चव्हाण करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा