ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत हरितोत्सवाचा महामंगल सोहळा — विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत हरितोत्सवाचा महामंगल सोहळा — विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

इचलकरंजी :

इचलकरंजी शहरात पर्यावरण संवर्धनासाठी हरितोत्सवाचा महामंगल सोहळा उत्साहात पार पडला. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वतीने राबविण्यात आलेल्या “माझी वसुंधरा अभियान ६.०” व “स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६” अंतर्गत शहरस्तरीय चित्रकला, निबंध, वक्तृत्व व सामान्य ज्ञान स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा ना.बा.घोरपडे नाट्यगृह येथे मोठ्या जल्लोषात झाला. हिरवाईने सजविलेले सभागृह आणि रोपांच्या सुगंधाने भारावलेले वातावरण यामुळे सोहळ्याला हरितोत्सवाचा पवित्र गंध लाभला.

Advt

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपांना पाणी घालून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत झाली. स्वागतही हिरव्या रोपांनी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान गीत व नृत्याविष्काराने वसुंधरेच्या संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे मांडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी भूषविले. त्यांनी विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत “प्रत्येक नागरिकाने छोटं पाऊल उचललं तर वसुंधरेवर हरित हास्य फुलेल,” असे आवाहन केले.

उपायुक्त नंदू परळकर यांनी तब्बल ११,३८० विद्यार्थ्यांच्या सहभागाची माहिती दिली. स्पर्धाप्रमुख राजेंद्र घोडके यांनी सर्व शिक्षक, स्वयंसेवक व आयोजकांचे आभार मानले. शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी विद्यार्थ्यांना “पर्यावरणाचे शिपाई” बनण्याचे आवाहन केले.

वक्तृत्व स्पर्धेत राजवीर सुतार, आलिदा शहापुरे आणि लक्षिता ओझा यांनी प्रभावी मांडणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. परीक्षक संजय रेंदाळकर आणि डी. एस. कोळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले.

या प्रसंगी उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे, सुनील शिंदे, संजय कांबळे, उमेश कांबळे, माजी नगरसेवक अमृत मामा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अनुकंपा तत्त्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना रुजू आदेश देण्यात आले, तर स्पर्धा समिती सदस्य, केंद्रप्रमुख व स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट शाळा व सामाजिक संस्थांचा सन्मानही यावेळी झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रावळ व वंदना गतारे यांनी केले आणि आभार संजय माळी यांनी मानले. समारोप “प्रत्येक विद्यार्थी हा वसुंधरेच्या रक्षणासाठी सज्ज सैनिक आहे” या प्रेरणादायी संदेशाने झाला.

फोटो-हरितोत्सव सोहळ्याप्रसंगी आयुक्त पल्लवी पाटील,उपायुक्त विद्या कदम,नंदू परळकर, राहुल मर्ढेकर व इतर 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा