ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेत महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेत महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी  : इमनपातर्फे तिथीनुसार महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महानगरपालिका सभागृहात महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, चे अध्यक्ष सतिश पाटील, वाल्मिकी समाज अध्यक्ष राजू रजपुते, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे तसेच संदीप जोशी, दिपक खोत, खेमचंद लालबेग, सुशिल पाडळकर, अशोक कमते आदी मान्यवर उपस्थित होते.

Advt

महर्षि वाल्मिकी यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी सामाजिक ऐक्य, समानता व मानवतेच्या मूल्यांवर आधारित त्यांच्या शिकवणीचे स्मरण केले. कार्यक्रमात सामाजिक सलोखा व बंधुत्वाचा संदेश देण्यात आला.

महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन करताना अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा