लालनगरमध्ये महिला व मुलांना मारहाण — चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
इचलकरंजी :
इचलकरंजी शहरातील लालनगर परिसरात घरात घुसून महिला व तिच्या मुलांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरील घटना मंगळवारी रात्री घडली या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
Advt
फिर्यादी साजीदा आयुब अन्सारी (वय ३२, व्यवसाय – शिलाई काम, रा. लालनगर, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बाबा संजु लोकरे, आनंद संजु लोकरे, मानव संजु लोकरे आणि विजु लोकरे (चुलता) सर्व रा. लालनगर यांनी फिर्यादी यांच्या राहत्या घरी घुसून त्यांना आणि त्यांच्या दोन्ही मुलांना शिवीगाळ केली. आरोपी बाबा लोकरे याने यंत्रमागाच्या लाकडी माऱ्यााने फिर्यादी यांना मारहाण केली तसेच उजव्या हातावर जोरदार प्रहार करून जखमी केले. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत जीव घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.तपास सहाय्यक फौजदार नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बेग करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







