दारू अड्ड्यावर आमदार डॉ. राहुल आवाडे यांची धाड — अड्डा उद्ध्वस्त, पोलिसांना फटकारले
इचलकरंजी –
इचलकरंजी शहरातील कुडचे मळा परिसरात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या दारू अड्ड्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेत आमदार यांनी स्वतः घटनास्थळी धडक देत अड्डा उद्ध्वस्त केला. अड्ड्यावर छापा टाकताना मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या, ड्रम आणि इतर साहित्य आढळून झाले.
या प्रकरणात विशेष लक्षवेधी बाब म्हणजे चार दिवसांपूर्वी संबंधित अड्ड्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती, तरीही कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आमदार आवाडे संतप्त झाले आणि त्यांनी घटनास्थळीच पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.
Advt
दारू अड्डा बंद पाडत आमदार आवाडे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करून कारवाईची मागणी करण्याचा इशारा दिला.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी आमदार आवाडे यांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले असून या घटनेने पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
आ.राहुल आवाडे यांनी टाकलेल्या धाडीत सापडलेल्या दारुच्या बाटल्या व साहित्य.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







