ICHMH51NEWS.IN
9921600800

बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचा सन्मान सोहळा भव्यदिव्यतेने संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचा सन्मान सोहळा भव्यदिव्यतेने संपन्न


इचलकरंजी:

बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचा गौरव करण्याचा आदर्श उपक्रम राबवणाऱ्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी सेंटरतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बिल्डर्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष जगन्नाथ जाधव उपस्थित होते.

Advt

जगन्नाथ जाधव म्हणाले, “देशात बावीस व राज्यात सात सेंटरची स्वतःची कार्यालये असून त्यात इचलकरंजी सेंटरचाही समावेश आहे, याचा अभिमान वाटतो. ‘बिल्डर्स डे’ निमित्त गेली तीन वर्षे चालू असलेला हा उपक्रम बांधकाम क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारांमुळे व्यावसायिकांना आणखी जोमाने काम करण्याची उर्मी मिळेल.”

या कार्यक्रमात माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते. उत्कृष्ट बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर या विशेष पुरस्काराने प्रल्हाद माने यांचा गौरव करण्यात आला. गुणवंत कामगार पुरस्कारांत चंपालाल मालविया (फरशी फिटिंग), जगदीश जांगिड (सुतार), धनंजय कुलकर्णी (पेंटर आतील), सतीश माने (पेंटर बाहेरील), निखिल महाजन (प्लंबर), संजय माने (फॅब्रिकेशन), चंद्रकांत सस्ते (बांधकाम गिलावा) आणि जगदीश हिरेमठ (सेंट्रींग) यांचा सन्मान झाला. तसेच आदी स्टील यार्डचे अरुण चौगुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

अविनाश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मोठा बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी अनेक घटकांची महत्त्वाची भूमिका असते. या घटकांचा सन्मान करण्याची परंपरा असोसिएशनने जपली आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. अध्यक्ष फैय्याज गैबान व शीतल काजवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. नितीन धूत यांनी प्रास्ताविकात असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला. इचलकरंजी सेंटरला “बेस्ट इमेज बिल्डिंग” पुरस्कार मिळाल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्याचा आढावा प्रताप साळुंखे यांनी दिला.

महाराष्ट्र राज्याध्यक्ष जाधव यांच्या हस्ते निर्देशिकेचे प्रकाशन तसेच २० नव्या सदस्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयूर शहा व राजेंद्र शिंत्रे यांनी केले, तर आभार रमेश मर्दा यांनी मानले.

या सोहळ्याला बांधकाम क्षेत्रातील व इचलकरंजीतील विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशासाठी दिलीप पटेल, तानाजी हराळे, पुंडलिक जाधव, भगवान कांबुरे, सुहास अकिवटे, संजय रुग्गे, मोहन सातपुते, पन्नालाल डाळ्या, शिवकुमार हिराणी, विकास चंगेडीया, सुधीर लाटकर, राजेंद्र खंडेराजुरी, श्रीकांत लासकर, महेश महाजन, महांतेश कोकळकी, शिवाजी पवार, स्वप्निल शहा आदींनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी-उत्कृष्ट बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर पुरस्कार स्वीकारताना प्रल्हाद माने व परिवार

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा