शहापूर येथे जुगार अड्ड्यावर छापा — १० जणांना अटक, रोख रक्कम व मोबाईलसह ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी:
शहापूर गावात उघड्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० जणांना अटक करण्यात आली असून रोख रक्कम आणि मोबाईल फोनसह एकूण ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहापूर पोलिसांनी गैबान पेट्रोल पंपासमोरील गायरान जमिनीत ओढ्याच्या काठी आरोपी हे तीन पानांच्या पत्यावर चढाओढीने पैसे लावून जुगार खेळत असताना ताब्यात घेतले.यामध्ये युहान सुनिल भोरे, प्रभाकर भिमराव माळगे, मुबारक महंमद तांबोळी, अजय पांडुरंग लोंढे, प्रविण बाबुराव जाधव, विनायक नारायण जगताप, शिवानंद हिराप्पा आवटी, हुसेन मौला अंकलगे, फक्रुदीन महंमद मुल्ला.यांचा समावेश आहे.या कारवाईत ४१,८०० रुपयांची रोख रक्कम तसेच ९ मोबाईल हॅण्डसेट किंमत ४७,५०० रुपये असा एकूण ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
छापा पथकात पोसई श्रीमती साबळे, सहा. फौजदार अविनाश मुंगसे, पोहेकॉ सुनिल पाटील, पो.ना. फिरोज बेग, पोहेकॉ असिफ शिराजभाई, पोकॉ सदाम सनदी, पोकॉ मगदुम आणि पोकॉ आयुब गडकरी आदींचा समावेश होता. तपास शहापूर पोलिसांकडून सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







