आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेत उपकरणांचे प्रात्यक्षिक
इचलकरंजी:
आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज आपत्ती व्यवस्थापन विभागातील अत्यावश्यक उपकरणांचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करण्यात आले. महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली.
Advt
या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे यांनी विविध उपकरणांची माहिती देत नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी प्रभावी उपाययोजना कशा राबवायच्या याबाबत मार्गदर्शन केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपकरणे हाताळून त्यांचा वापर जाणून घेतला.
या कार्यक्रमाला उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा. आयुक्त रोशनी गोडे, सहा. आयुक्त विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे यांच्यासह फायर जवान व महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात तत्परता, जागरूकता व योग्य साधनसामग्रीचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी टाळता येऊ शकते, असा संदेश या प्रात्यक्षिकातून देण्यात आला.
प्रात्यक्षिक सादरीकरण करताना संजय कांबळे समोर उपस्थित अधिकारी वर्ग
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







