हुतात्मा कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ भव्य महारक्तदान शिबीराचे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे आयोजन
इचलकरंजी :
प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी झालेल्या ऐतिहासिक कारसेवेदरम्यान कोठारी बंधूनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, इचलकरंजी यांच्या वतीने भव्य महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. राम मंदिर निर्मितीच्या काळात कारसेवे दरम्यान अनधिकृत ढाच्यावर भगवा ध्वज फडकवताना व तो ढाचा पाडताना प्रशासनाच्या कारवाईत वीर बजरंगी रामकुमार कोठारी व शरद कोठारी या भावंडांनी वीरमरण पत्करले होते. त्यांच्या या अमूल्य त्यागाचे स्मरण व सन्मान म्हणून तसेच इचलकरंजी व परिसरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे या सामाजिक कार्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर रक्तदान शिबीराचे आयोजन दि. २ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी व्यंकटराव हायस्कूल, इचलकरंजी येथे सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. एखाद्याचे प्राण वाचविण्याचे पुण्य रक्तदात्यांना लाभते तसेच शरीरासाठीही ते आरोग्यदायी ठरते.
Advt
त्यामुळे इचलकरंजी तसेच आजूबाजूच्या भागातील नागरिक, युवक व युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदानासाठी आवश्यक अटी म्हणजे रक्तदाता निरोगी असावा, कोणतेही औषधोपचार सुरू नसावेत, वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे, वजन किमान ५० किलो असावे, हिमोग्लोबिन (Hb) किमान १२.५ असावे आणि रक्तदान दर ३ महिन्यांतून एकदा करता येते. — विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, इचलकरंजी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







