ICHMH51NEWS.IN
9921600800

अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा – अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्याला टाळे ठोकू! शिवसेना (उबाठा) पक्षाचा इशारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा – अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्याला टाळे ठोकू!
शिवसेना (उबाठा) पक्षाचा इशारा

हातकणंगले –
छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहापूर ते तारदाळ नाका तसेच समाज मंदिर ते म्हसोबा मंदिर या रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. या निष्काळजीपणामुळे नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीची परिस्थिती पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे, धूळ आणि चिखलामुळे नागरिक, विद्यार्थी व वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Advt

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. युवासेना शहरसमन्वयक रतन वाझे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता शिवाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले. “तात्काळ दोन्ही रस्त्यांची कामे सुरू करून वेळेत पूर्ण करा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल,” असा इशारा या निवेदनातून देण्यात आला.

समाज मंदिर ते म्हसोबा मंदिर या रस्त्यावर अद्याप सीलकोट आणि कार्पेट टाकणे बाकी असल्याने रस्ता पुन्हा खराब होऊ लागला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तारदाळ नाका या मुख्य मार्गावरील अर्धवट कामामुळे जनतेचा रोष वाढत असून, प्रशासनाने आता जागे व्हावे, अन्यथा शिवसेना जनतेचा आवाज रस्त्यावर उतरून बुलंद करेल, असा इशारा युवासेना शहरसमन्वयक रतन वाझे यांनी दिला.

या रस्त्याचे मक्तेदार मयूर भोसले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही वाझे यांनी सांगितले.

निवेदन देताना साहाय्यक अभियंता गुरव, युवासेना शहरसमन्वयक रतन वाझे, हिंदू खाटीक समाजाचे शहराध्यक्ष संतोष काळगे, कुबेर लाटवडे, प्रथमेश भस्मे, श्रेणीक तेली आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिवाजी पाटील यांना निवेदन देताना रतन वाझे व कार्यकर्ते

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा