गट खुला करण्यासाठी लाच स्वीकारताना तलाठी व कोतवाल अटकेत
इचलकरंजी:
गट खुला करण्यासाठी लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत लोकसेवक गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२ तलाठी, सजा शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि कोतवाल नेताजी केशव पाटील (वय ४५, रा. शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारावर, आरोपींनी तक्रारदारांचे वडिलांचे नाव गट नंबर ७२९ क्षेत्र सातबारा पत्रकी मध्ये फेरफार करून नोंदणी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली, त्यापैकी १० हजार रुपये कोतवाल नेताजी पाटील यांच्याकडे देताना रंगेहात पकडण्यात आले.
Advt
सापळा पथकात पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप,पो.ह. सुधीर पाटील,पो.कॉ. कृष्णा पाटील,प्रकाश चौगुले,चालक गजानन कुराडे,तपास अधिकारी: उज्वला भडकमकर, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., कोल्हापूर यांनी भाग घेतला,कारवाई वैष्णवी पाटील, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.आरोपी तलाठी आणि कोतवाल यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते
संशयित आरोपी गणेश सोनवणे व नेताजी पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







