ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सामुहिक ‘वंदे मातरम्’ गीत गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सामुहिक ‘वंदे मातरम्’ गीत गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न

इचलकरंजी, दि. ७ नोव्हेंबर –
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या निर्देशानुसार ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सामुहिक ‘वंदे मातरम्’ गीत गायन कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण आयोजन आज (शुक्रवार) महानगरपालिका प्रांगणात करण्यात आला.

Advt

कार्यक्रमाला आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील आणि अतिरिक्त आयुक्त सौ. सुषमा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थितांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन करून देशभक्तीचा संदेश दिला.

या प्रसंगी उपायुक्त नंदू परळकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त रोशनी गोडे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, सदाशिव जाधव, प्रदीप झमरी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामूहिक वंदे मातरम गीत गायन प्रसंगी आयुक्त पल्लवी पाटील व अधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा