सह.पालकमंत्री नाम. माधुरीताई मिसाळ यांनी घेतला महानगरपालिका कामकाजाचा आढावा
इचलकरंजी
कोल्हापूर जिल्ह्याच्या सह. पालकमंत्री तथा राज्यमंत्री नगरविकास यांनी इचलकरंजी महानगरपालिकेस भेट देऊन महानगरपालिका कामकाजाचा आढावा घेतला.
यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेली विविध विकास कामे, अमृत २.०, नाविन्यपूर्ण उपक्रम,
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मलनिस्सारण प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, पंचगंगा नदी प्रदूषण, समाज विकास विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजना, महानगरपालिका आकृतीबंध, मालमत्ता कर वाढीसाठी केलेल्या उपाययोजना, ई प्रशासन या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.
या आढावा बैठकीस आमदार डॉ.राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी पी.पी.टी. च्या माध्यमातून महानगरपालिका कामांचे सादरीकरण केले.
यावेळी आयुक्त यांनी मा.मंत्री महोदया यांचेकडे प्रलंबित सहायक अनुदान तसेच प्रलंबित जी. एस. टी. परतावा रक्कम महानगरपालिकेस मिळावी ही मागणी प्रामुख्याने केली. या मागणीबाबत मा. मंत्री महोदया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
तसेच पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण, शहरातील तृतीय पंथीयासाठी स्वच्छता गृह,महानगरपालिकेच्या शाळांमध्ये समृद्ध शाळा योजनेच्या अंतर्गत आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे बाबत सूचना दिल्या.
त्याचबरोबर नगररचना विभागाकडील योजना क्र. १ व २ मधील क- १ हा शेरा काढणे आणि फेरबदल करणे या विषयावर महसूल मंत्री नाम. चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे बैठक घेऊन मार्ग काढण्याची ग्वाही दिली.
या बैठकीस मा. मंत्री महोदया यांचे स्वीय सहाय्यक डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम , मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, सहा आयुक्त रोशनी गोडे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पी.टी. मोरे, कार्यकारी अभियंता एम.एस. इ.बी. वैभव गोंदिल, भूमी अभिलेख विभागाचे किरण माने यांचेसह महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.
सहपालकमंत्र्यांच्या ओएसडी ना सुरक्षाव्यवस्थेचा फटका.
इनपाचे तत्कालीन मुख्याधिकारी व आताच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचे स्वीय सहायक डॉ प्रशांत रसाळ मनपा बैठकीतील काही मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी आगोदर महापालिकेत आले असता त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवले व ओळख सांगूनही बॅग चेक करून मगच आत सोडण्यात आले.इचलकरंजी महापालिकेच्या अतिरेकी सुरक्षाव्यवस्थेची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचे स्वागत करताना आयुक्त पल्लवी पाटील, आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,डॉ प्रशांत रसाळ,अति आयुक्त सुषमा शिंदे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







