क 1 शेरा निघण्यासाठी तयार केलेल्या आलेखाची 1 महिन्यात मोजणी पुर्ण करा-नगरविकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश
इचलकरंजी:
इचलकरंजी शहरातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रॉपर्टी कार्ड वरील क 1 शेरा काढण्यासंदर्भात आज इचलकरंजी महानगरपालिका मध्ये व्यापक बैठक झाली या बैठकीमध्ये सारथी इंजिनिअरिंग वर्क्स पुणे या कंपनीने तयार केलेले 42 अभिलेख व आलेख यांची तपासणी 1 महिन्यात पुर्ण करण्याचे आदेश नगर विकास राज्यमंत्री सौ माधुरी ताई मिसाळ यांनी भूमापन अधिकारी इचलकरंजी यांना दिले त्यामुळे गेली 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.
इचलकरंजी शहरातील सुमारे वीस हजार नागरिकांचे प्रॉपर्टी कार्ड मध्ये क 1 शेरा असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या जागेवर कोणतेच डेव्हलपमेंट करता येत नाही बँकेचे कर्ज मिळत नाही अथवा नवीन बांधकाम करता येत नाही त्यामुळे क 1 शेरा काढण्यासाठी भाजपा शहर उपाध्यक्ष दिपक पाटील, नगरसेवक मनोज साळुंखे, नगरसेवक शहाजी भोसले यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या प्रयत्नातून आज इचलकरंजी महानगरपालिका मध्ये राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री सौ माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली क 1 शेरा काढण्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
2017 साली सारथी इंजिनिअर्स पुणे यांनी तयार केलेले आलेख स्वीकारण्यास भुमापन कार्यालय इचलकरंजी तयार न्हवते. या विषयासंदर्भात बैठक लागणार हे समजल्यावर या कार्यालयाने सदर नकाशे स्वीकारले याबाबत मंत्री महोदयांनी नाराजी व्यक्त केली.
सारथी इंजिनियर्स यांनी तयार केलेल्या 42 आलेखवार भूकरमापक कोगेकर यांनी सह्या केलेल्या आहेत परंतु त्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली नाही त्यामुळे सदर नकाशे अधिग्रहण करण्यास टाळा टाळ होतं असल्याचे दिपक पाटील यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच नगरसेवक मनोज साळुंखे यांनी नगरभामापन कार्यालय गेली 10 वर्षांपासून जाणून बुजून टाळा टाळ करीत आहेत त्यामुळे नागरिकांचे अतिशय नुकसान होतं असल्याचे सांगितले.
त्यामुळे नगरभूमापन कार्यालय जाणून बुजून टाळा टाळ करीत असल्याचे मंत्री मिसाळ यांच्या लक्षात आले त्यामुळे 1 महिन्यामध्ये एकूण नकाशाच्या 10 टक्के नकाशे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळनी करून त्याचा अहवालदेण्याचे आदेश मिसाळ यांनी दिले आहेत. त्यामुळे या कामाला गती मिळणार असून 1 महिन्यांनी पून्हा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे मंत्री मिसाळ यांनी सांगितले.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आयुक्त श्रीमती पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, नगररचनाकार प्रशांत भोसले, भुमी अभिलेख अधीक्षक श्रीमती कल्पना मुंडे, किरण माने, नगरसेवक तानाजी पोवार, मारुती पाथरवट, राजकुमार भाकरे, सौ. संगीता साळुंखे, सौ. सुप्रिया संकपाळ, सागर कुंभार, अभय बाबेल, निलेश आवळेकर, फारुख बागेवाडी, सुनील साळुंखे, राहुल दोडे, बबन आरेकर, यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
सहपालकमंत्री मिसाळ यांच्यासमोर मुद्दा मांडताना दीपक पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







