ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आणि बालदिन मोठ्या उत्साहात साजरा….

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आणि बालदिन मोठ्या उत्साहात साजरा….

इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आ. रा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथील वरिष्ठ व कनिष्ठ सांस्कृतिक विभागामार्फत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान आपल्या विस्तृत आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून स्पष्ट केले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलेली पंचशील तत्वे किंवा समाजवादी विचारसरणी असेल त्यांची आज सध्या समाजाला खूप गरज आहे आणि विद्यार्थिनी म्हणजेच बालके ही देशाचे उद्याचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी जेवढ्या काही चांगल्या सेवा आपल्याला देता येतील त्या आपण दिल्या पाहिजेत, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे तत्त्वज्ञान आपण अंगीकारले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी कु. सायली देसाई हिने आपल्या मनोगतातून पंडित जवाहरलाल नेहरू आणि बालदिन यांचा संबंध स्पष्ट करून त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांना उजाळा दिला.

या कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री संजय गुजर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कनिष्ठ विभाग प्रमुख श्रीमती सोनाली बोरगावकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. एकता जाधव यांनी केले आभार डॉ. विठ्ठल नाईक यांनी मानले.

यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अभिवादन करताना प्रा त्रिशला कदम व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा