ICHMH51NEWS.IN
9921600800

लग्नाची जबरदस्ती न मानल्याने तिघांकडून मारहाण; लोखंडी कटरने वार, एक गंभीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लग्नाची जबरदस्ती न मानल्याने तिघांकडून मारहाण; लोखंडी कटरने वार, एक गंभीर

इचलकरंजी

यड्राव, ता. शिरोळ – दि. १३ नोव्हेंबर रोजी पार्वती इंडस्ट्रीजजवळ दुपारी २.३० वाजता मुलींचे लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तिघा युवकांकडून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केल्याची घटना घडली.

फिर्यादी शब्बीर डोंगरीसाब शेख (वय ३९, रा. समर्थनगर, तारदाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी साहील रशीद सय्यद (वय २०), साजीद रशीद सय्यद (वय २२) व आरमान मोमीन (वय २४) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये साहील सय्यद याने लोखंडी कटरने सोहेल शफिक शिरोळे यांच्या उजव्या दंडावर वार करून गंभीर जखमी केले.

घटनेनंतर शहापुर पोलिसांनी तत्पर कारवाई करत साहिल व साजिद सय्यद याना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करत लोखंडी कटर जप्त करण्यात आला आहे.

तपास पो.ह.वा. पोपट भंडारे करीत असून जखमीचा उपचार सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा