कु. स्वरा कोळी हिचे दांडपट्टा स्पर्धेत यश
इचलकरंजी – सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंकय क्रिडा स्पर्धेत
कु. स्वरा राहूल कोळी या विद्यार्थीने घवघवीत यश मिळवळे. स्वरा कोळी हिने ९ वर्षाखालील गटात दांडपट्टा हस्तलम गटात प्रथम क्रमांक संपादन केले आणि सुवर्णपदक पटकावले या शिवाय सांघीक गटातही एक सुवर्णपदक मिळवले. तिला केतकी रेंदाळ, शेलार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वरा कोळीला दांडपट्टा स्पर्धेतील कामगिरीसाठी सातारा येथे गौरवण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







