कबनूर देवस्थान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याची मागणी; विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाचे अप्पर तहसीलदारांना निवेदन
इचलकरंजी –
कबनूर गावठाण हद्दीतील देवस्थानाच्या जमिनीवर सुरू असलेले अतिक्रमण तातडीने हटवावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, इचलकरंजी जिल्हा यांच्या वतीने आज अप्पर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. २५ डिसेंबरपर्यंत संबंधित विभागाने कोणतीही कारवाई न केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
हे निवेदन देताना संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात सुजित जी कांबळे, मधुसूदन भोई, अमित कुंभार, बाळासाहेब ओझा, सर्जेराव कुंभार, अमोल शिरगुप्पे, विशाल माळी, डांगरे मामा, उमेश सागावकर, गिरीश खरबुडे, दीपक कडगावे, रविकिरण हुक्किरे, गडदगे मामा, मुकेश चोथे, मुकुंदराज ऊरूणकर, रमेश निकम, भिकाजी पाटील, प्रीतम लोटके, अमित पाटील, दिग्विजय महाजन, सुनील जाधव, रवी पाटील, शुभम कळेकर, शेखर देवकर, विजय पाटील यांचा समावेश होता.
अप्पर तहसीलदार कार्यालयात निवेदन देताना विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







