ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहरातील पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत; गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहरातील पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत; गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू

इचलकरंजी –

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेतील जुनी पाण्याच्या दाबनलिकेमध्ये आज मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मजरेवाडी जॅकवेलजवळ गळती आढळल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा दुपारी ४ वाजल्यापासून तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

महानगरपालिका प्रशासनाने तातडीने गळती काढण्याचे काम हाती घेतले असून, बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत शहरवासीयांना अपुरा पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून, नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा