शहापूर पोलिस ठाण्यातील सागर पवार यांचे हृदयविकाराने निधन
शहापूर –
शहापूर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या सागर राजेंद्र पवार (वय ३६) यांचा पहाटे झोपेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाची सावली कोसळली आहे.
पवार यांचे पश्चात कुटुंबीयात पत्नी रुपाली सागर पवार, मुलगी अर्पिता (वय ९ वर्षे), मुलगा स्वराज (वय ५ वर्षे) तसेच आई-वडील यांचा समावेश आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांनी या दु:खद घटनेची माहिती दिली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







