ICHMH51NEWS.IN
9921600800

विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दैदीप्यमान यश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दैदीप्यमान यश

इचलकरंजी :

जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर अंतर्गत श्री अण्णासाहेब डांगे क्रीडा संकुल, आष्टा (जि. सांगली) येथे झालेल्या शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले. १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील मुलींच्या संघांनीही स्पर्धेत उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

१९वर्षाखालील गटातून रोजा समीर कलावंत हिची राज्य निवड चाचणीसाठी तर १७ वर्षाखालील गटातून स्नेहा बसूदे हिची राज्य निवड चाचणीसाठी निवड झाली.

या यशस्वी कामगिरीसाठी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा. श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर महेश बांदवलकर, मानद सचिव बाबासो वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन मारोतराव निमनकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी, उपमुख्याध्यापिका व्ही. एस. लोटके, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षक एस. एस. कोळी, पर्यवेक्षिका एन. एम. कांबळे व ज्येष्ठ शिक्षक डी. डी. कोळी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.

या तिन्ही संघांना कोच शेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिमखाना प्रमुख बी. एस. माने, क्रीडा शिक्षक के. ए. पाटील व व्ही. के. पाटील यांचेही मार्गदर्शन खेळाडूंना मिळाले.

यशस्वी खेळाडूंसोबत कृष्णा बोहरा,मुख्याध्यापिका काझी,शेखर शहा सर व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा