पार्वती शंकर कुडाळकर यांचे निधन.संजय कुडाळकर यांना मातृशोक
इचलकरंजी, ता. २० : इचलकरंजी येथील गावभाग परिसरातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती पार्वती शंकर कुडाळकर (वय ८३) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. बी न्यूजचे इचलकरंजी प्रतिनिधी संजय कुडाळकर यांच्या त्या मातोश्री तर मयुर चिंदे व अमर चिंदे यांच्या त्या आजी होत.
त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रक्षा विसर्जन रविवारी (ता. २३) सकाळी ८ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार असल्याची माहिती परिवाराकडून देण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







