ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत पसरत असलेले वृत्त दिशाभूल करणारे : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये — उपायुक्त नंदू परळकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत पसरत असलेले वृत्त दिशाभूल करणारे : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये — उपायुक्त नंदू परळकर

इचलकरंजी:

इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात काही वृत्तपत्रे व समाजमाध्यमांवर “महानगरपालिका निवडणूक लांबणीवर पडणार” अशा आशयाची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. या वृत्तांमध्ये कोणताही अधिकृत पुरावा किंवा आधार नसून, अशा बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त (निवडणूक) नंदू परळकर यांनी स्पष्ट केले आहे.

महानगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेश व अधिकृत वेळापत्रकानुसार सुरू असून, निवडणूक लांबणीवर पडण्यासंबंधीची कोणतीही सूचना किंवा निर्णय प्राप्त झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

अनधिकृत माहितीच्या आधारे पसरवल्या जाणाऱ्या अशा अफवा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या असल्याने, कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये, तसेच सामाजिक माध्यमांवर अशा चुकीच्या बातम्या पुढे पसरवू नयेत, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा