इचलकरंजीत गुटखा विक्रेत्यावर कारवाई; १२,८०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी :
शहरातील पंचगंगा फॅक्टरी परिसरातील रेणुका पानपट्टीवर बेकायदेशीर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शंकर बाबगौंडा पाटील (वय ६०, रा. कबनूर, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांनी दुकानातून विविध कंपन्यांच्या पानमसाला, सुगंधी तंबाखू, गुटखा, तसेच विक्रीसाठी ठेवलेली एकूण १२,८०२ रुपये किंमतीची सामग्री आणि १,१०० रुपये रोख रक्कम जप्त केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







