ICHMH51NEWS.IN
9921600800

यड्राव रस्त्यावर भीषण अपघात; मोटारसायकलस्वार ठार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

यड्राव रस्त्यावर भीषण अपघात; मोटारसायकलस्वार ठार

इचलकरंजी
कोंडीग्रे ते यड्राव जाणाऱ्या रस्त्यावर बेघरवसाहत वळणाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात चंद्रकांत सुरेंद्र किनींगे (वय ५७, रा. जैनमंदिर जवळ, बुबनाळ) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहापूर पोलीसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत चंद्रकांत किनींगे हे आपल्या होंडा शाइन मोटारसायकल (क्रमांक MH-09-EE-6438) वरून यड्रावकडे जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या अशोक लेलॅन्ड कंपनीच्या कंटेनर (क्रमांक KA-48-A-1435) च्या चालकाने बेदरकारपणे, भरधाव वेगाने वाहन चालवून मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत किनींगे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी राघोबा भाऊराव किनींगे यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली.या प्रकरणाचा तपास सहा फौजदार मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा