ICHMH51NEWS.IN
9921600800

‘संकटातून संकल्पाकडे’ सन्मान सोहळ्यात दत्ताजीराव कदम कॉलेजचा गौरव

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘संकटातून संकल्पाकडे’ सन्मान सोहळ्यात दत्ताजीराव कदम कॉलेजचा गौरव

इचलकरंजी :

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि मॉडर्न महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत केलेल्या महाविद्यालयांचा ‘संकटातून संकल्पाकडे’ या उपक्रमांतर्गत सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी यांचा सन्मान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते झाला.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाने इचलकरंजीत रॅली काढून नागरिकांकडून मदत गोळा केली. शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेत जमा निधीतून सोलापूर जिल्ह्यातील भोसरे गावातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

या उपक्रमात डॉ. सुनील भोसले, डॉ. अजिंक्य पत्रावळे, सौ. पूजा पारिशवाड, डॉ. सारिका पाटील, प्रा. निलेश जाधव, प्रा. संदीप पाटील, कॅ. विनायक भोई, श्री. मुज्जफर लगीवाले तसेच NSS व NCC स्वयंसेवक विद्यार्थी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्राचार्य प्रा. (डॉ.) शंकर खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.


मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना प्राचार्य एस के खाडे व पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा