लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; शहापुर पोलिसांत गुन्हा दाखल
शहापुर:
लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेला सुमारे दोन वर्षे शारिरिक अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अनिस अमीर मुल्ला (रा. गल्ली नं. ११, दत्तनगर, शहापुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस न्यायालयात हजर केले असता २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या मुलासह २०२३ सालापासून भाड्याने राहत होत्या. या काळात आरोपीशी त्यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळख वाढत गेली आणि आरोपीने “मी तुझ्याशी लग्न करीन आणि मुलाचाही सांभाळ करीन” असे आमिष दाखवले. या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादी आरोपीच्या संपर्कात राहिल्या.मात्र २०२३ ते मे २०२५ या काळात कोरोची परिसरात अनेक वेळा आरोपीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकाराने त्रस्त होऊन फिर्यादी महिलेने अखेर पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. सहाय्यक फौजदार मोहिते यांनी गुन्हा नोंदवला असून बपोसई साबळे व कुटे हे पुढील तपास करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







