सार्वजनिक शौचालय नुतनीकरणास सुरवात
इचलकरंजी
माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून सार्वजनिक शौचालयांच्या नुतनीकरणासाठी २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून शहरातील विविध १३ ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयांच्या नुतनीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ जामदार गल्ली येथे करण्यात आला.
इचलकरंजी शहरातील महानगरपालिका हद्दीतील विविध भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची अत्यंत दूरवस्था झाल्याने नागरिकांना अत्यंत अडचणी येत होत्या. त्यांचे नुतनीकरण करण्याबाबत भागातील नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. या संदर्भात माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सार्वजनिक शौचालयांच्या नुतनीकरणासाठी निधी मंजूर करून आणला. या कामाची सुरुवात जामदार गल्ली येथून करण्यात आली. टप्प्याटप्याने उर्वरीत भागातील सार्वजनिक शौचालयांचे नुतनीकरणाचे काम होणार आहे. या कामामुळे भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी बाळासाहेब कलागते, नंदु पाटील, पै. अमृत भोसले, सचिन माळी, प्रमोद बचाटे, सुशांत कलागते, अनिकेत पाटील, प्रमोद कोले, सुनील मुदगल, मनोज केसरकर, माया शिंदे, लता मुदगल, कांचन मोरे, वनिता कोले, विमल चव्हाण, रंजना कवटगे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते. या कामामुळे भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
नूतनीकरण कामाचा शुभारंभ करताना बाळासाहेब कलागते,अमृत भोसले,नंदू पाटील व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







