ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत मतदार यादीतील त्रुटींवरून खळबळ; ऋषिकेश मुसळेंकडून आयुक्तांना निवेदन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत मतदार यादीतील त्रुटींवरून खळबळ; ऋषिकेश मुसळेंकडून आयुक्तांना निवेदन.

व्हिडीओ-https://youtube.com/shorts/TXSwekv04vQ?si=JBOMRyVo7IG-nH_M

 

इचलकरंजी :

महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच शहरातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या त्रुटींवरून प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांमध्ये गोंधळ आणि नाराजी निर्माण झाली आहे. या संदर्भात युवा नेते ऋषिकेश बंडोपंत मुसळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांना लिखित निवेदन देत तातडीने दुरुस्तीसाठी मागणी केली.

निवेदनानुसार, गेली ३० ते ४० वर्षे प्रभाग क्रमांक २ मध्ये राहणारे तब्बल ७०० ते ८०० मतदारांची नावे अचानक प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत. ही संख्या एक-दोन नावांची नसून शेकडो नागरिकांची असल्याने हा प्रकार गंभीर असल्याचे मुसळे यांनी लक्षात आणून दिले.

फक्त तीन दिवसांचा हरकतीचा कालावधी उपलब्ध असताना एवढ्या मोठ्या संख्येतील मतदारांनी हरकती कशा दाखल करायच्या आणि या बदलामागचे कारण काय, याबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण मिळालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार यादितील अचानक झालेल्या बदलाचा फायदा नेमका कोणाला होणार? कोणत्या निकषांवर नावे स्थलांतरित करण्यात आली? याचे उत्तर अद्याप अस्पष्ट असल्याचा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मुसळे यांनी शहर आयुक्त पल्लवी पाटील आणि उपयुक्त परळकर यांची भेट घेऊन ही चूक तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.

यावेळी ऋषिकेश मुसळे, श्रीकांत मुसळे, रमजान मुल्ला, सचिन अहिरेकर, निवास रावळ, सोमनाथ टकले, आनंद भोसले, संदीप पाटील, दिनेश कानेकर, आकाश चोरगे, आदित्य रावळ यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.

उपायुक्त परळकर यांच्याशी चर्चा करताना ऋषिकेश मुसळे व कार्यकर्ते

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा