ICHMH51NEWS.IN
9921600800

डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयात एनसीसी डे उत्साहात; अनाथाश्रमातील मुलांना मदतीचा हात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयात एनसीसी डे उत्साहात; अनाथाश्रमातील मुलांना मदतीचा हात

इचलकरंजी :

डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयात एनसीसी डे उत्साहात साजरा करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ मा. श्री कौस्तुभ गावडे यांच्या संकल्पनेतून एनसीसी विभागाने ‘बालोद्यान’ अनाथ आश्रमातील मुलांसाठी सामाजिक उपक्रम राबविले. कॅडेटनी शहरातून मदतपेटीद्वारे निधी जमा करून ६६ स्वेटर, दोन वॉटर हीटर, १०० किलो साखर व १० डझन वह्या आश्रमाला प्रदान केल्या. मुलांसाठी स्नेहभोजन आणि परिसरात श्रमदानही करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी उपक्रमाचे कौतुक करताना “हा महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे सांगितले. एनसीसी प्रमुख प्रा. लेफ्ट. विनायक भोई यांनी “गरजू मुलांना मदत करता आली याचा आनंद आहे,” अशी भावना व्यक्त केली. मागील महिन्यात पूरग्रस्तांसाठी सोलापूर येथील महाविद्यालयाला मदत करण्याचाही उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमास प्रा. रोहित शिंगे, प्रा. प्रथमेश गवळी, श्री संजय खुळ व कॅडेट उपस्थित होते.

बलोद्यान येथे मदत सुपूर्द करताना डि के ए एस सी कॉलेजचे शिक्षक 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा