इचलकरंजी महानगरपालिकेत संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन
इचलकरंजी
देशभरात साजरा होणाऱ्या संविधान दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर महानगरपालिका इमारतीच्या प्रांगणात आयुक्त पल्लवी पाटील, मान्यवर आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमास उपायुक्त नंदु परळकर, अशोक कुंभार, विद्या कदम, सहायक आयुक्त रोशनी गोडे, मुख्य वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, शिक्षण अधिकारी बी. एम. कुंभार, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, प्रशासन अधिकारी इरफान पटेल, इतर अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक शाळांचे शिक्षक व विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करताना आयुक्त पल्लवी पाटील, अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







