ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत युवकावर चाकूहल्ला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत युवकावर चाकूहल्ला

इचलकरंजी

शहरातील सांगली रोड परिसरात एका ३२ वर्षीय युवकावर चाकूहल्ला झाल्याची घटना दि. २५ नोव्हेंबर रोजी रात्री घडली असून इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आकाश रावसाहेब शेंडगे (वय 32, रा. सांगली रोड, पाटील मळा, अहिंसा कॉलनी, इचलकरंजी) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रात्री ८ च्या सुमारास सांगली रोडवरील हनुमान मंदिराजवळ त्यांच्यावर आरोपी बबलू नलवडे (रा. पाटील मळा, इचलकरंजी) याने चाकूने प्राणघातक हल्ला केला. आरोपीने फिर्यादी यांच्या डाव्या पायाच्या मांडीच्या पाठीमागील बाजूस चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

सदर गुन्हा  पोसई सीमा डोंगरे यांनी दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ  कुरणे हे करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा