ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ४३ वर्षीय गृहीणी बेपत्ता

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ४३ वर्षीय गृहीणी बेपत्ता

इचलकरंजी : षटकोन चौक परिसरातील ४३ वर्षीय गृहीणी रुपाली अजय सातपुते या घरातून कोणास काही न सांगता निघून गेल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वर्दीदार अजय दिलीप सातपुते (वय ४४ रा. वॉर्ड नं. १६ घर नं. ३३३, षटकोन चौक, इचलकरंजी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता ही घटना घडली. सातपुते हे नाईट शिफ्टवरून घरी परतल्यावर बाथरूममध्ये गेल्यानंतर त्यांच्या पत्नी रुपाली यांनी घराबाहेरून कडी लावून घर सोडले. काही वेळानंतर त्या घरात आढळल्या नसल्याने वर्दीदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

बेपत्ता झालेल्या रुपाली सातपुते यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : अंगाने मध्यम, रंग गोरा, उंची 5 फूट 3 इंच, कुरळे काळे लांब केस, लांब नाक, काळे डोळे, अंगात हिरव्या रंगाचा चुडीदार, पायात लेगिन्स आणि कोल्हापुरी चप्पल, कानात सोन्याचे टॉप्स, भाषा मराठी आणि स्पष्ट बोलतात.पुढील तपास पोहेकॉ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने शोधमोहीम हाती घेतली असून नागरिकांनी सदर महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा