तारण मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश,दोघांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड, कोल्हापूर शाखेच्या ताब्यात असलेल्या तारण मालमत्तेत आरोपींनी बेकायदेशीर प्रवेश करून तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी अपूर्व थॉमस दंथी (वय ३६ एरिया लिगल मॅनेजर, शाखा पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सलमान गुडूसाब चिंचले (वय ३२) आणि तेहसीन सलमान चिंचले (वय २९) यांनी सिक्युरिटी गार्डच्या देखरेखीखाली सील, कुलुपे तोडले आणि फलक नष्ट केले, तसेच तारण मालमत्तेत बेकायदेशीर ताबा घेतला. यामुळे कंपनीला आर्थिक नुकसान झाले.
सदर प्रकरणी तपास पो.ना कांबळे करत असून पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड प्रभारी आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







